Latest Marathi News
Ganesh J GIF

पुणे शहर हादरलं! कोंढवा परिसरात वाळू व्यावसायिकावर दिवसाढवळ्या गोळीबार

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडत असणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आणखी भर पडली आहे. शहरात उद्या होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी आज पुन्हा एकदा दोन ते तीन जणांनी वाळू व्यावसायिकावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने पुणे शहरात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत वाळू व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे.

दिलीप गायकवाड असं गोळीबार झालेल्या वाळू व्यावसायिकाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज (दि. १६) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. हा हल्ला पूर्व वैमन्यासातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी कि, कोंढवा परिसरातील साळवेनगर परिसरात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दिलीप गायकवाड यांच्यावर दोन ते तीन हल्लेखोरांनी हल्ला केला. या घटनेत वाळू व्यावसायिक दिलीप गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, गोळीबार केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हल्लीखोरांनी दोन ते तीन गोळ्या झाडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!