पुणे महाविद्यालयीन तरुणी अत्याचार प्रकरण;आमदार रवींद्र धंगेकर यांचं पुणे पोलिसांना पत्र, पत्रातून केले धक्कादायक खुलासे
सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून पुण्यातील शहरातील प्रसिद्ध कॉलेजमध्ये एका अल्पवयीन तरुणीवर चौघांनी बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून आरोपींनी मुलीला भेटायला बोलावले होते. त्यावेळी चौघांनी तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हे प्रकरण चार महिन्यांनी उघडकीस आले.
याप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलिसांना पत्र लिहिले असून यात त्यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. पिडीत मुलगी ही एका प्राध्यापकाची मुलगी असून याबाबत प्राध्यापकाने ट्रस्टींकडे तक्रार केली होती, परंतु आरोपी मुले ही बड्या बापाची असल्याने ट्रस्टींनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे. धंगेकर यांनी हे पत्र ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे. पिडित मुलीच्या पालकांवर संस्थेने दबाव आणला का? बड्या बापाच्या मुलांना याप्रकरणी वाचवले जात आहे का ? याबाबत सखोल तपास करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.