पुणेकरांनो! सीएनजी गॅसवरील वाहन वापरत आहात का?
सीएनजीवरील वाहन वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, एकदा वाचाच
पुणे दि २६(प्रतिनिधी)- सीएनजी गॅसवरील गाडी वापरणाऱ्या पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यात सीएनजी पंप चालकांनी बेमुदत पंप पुकारला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सीएनजी पंप उद्यापासून अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे. सीएनजी पंप बंद राहणार असल्याने पुण्यातील वाहतूक व्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता आहे.
टोरंट कंपनीने नफ्याचा हिस्सा न दिल्याने हा संप होणार आहे. या संपाबद्दल बोलताना पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल म्हणाले की, ‘उद्यापासून टोरंट कंपनीच्या डीलरने सीएनजी खरेदी-विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने १-११-२०२१ रोजी सीएनजी विक्रीतील नफ्फ्याच्या हिस्साचे सुधारित परिपत्रक जारी केले होते. त्यानंतरही टोरंट कंपनीने एकही रुपया वाढवून दिला नाही’. त्यामुळे सीएनजी चालकांचं खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रत्येक सीएनजी पंप चालकांचं २० लाखांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे सीएनजी पंप चालक बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे. यामुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे.
पुणे शहरातील ‘एमएनजीएल’ची सेवा मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. यापुर्वीही यासाठी चालकांना संप पुकारला होता. आता पंपचालक मागण्यांवर आडून बसले आहेत. त्यामुळे याचा त्रास सामान्य ग्राहकांनाही सहन करावा लागणार आहे.