Latest Marathi News
Ganesh J GIF

खरातच्या ऑफिसवर धाड; काळे पेढे, काळी फळं आणि बरंच काही….

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलांचं लैंगिक शोषण आणि भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. एसआयटीच्या तपासात खरातच्या काळ्या कारनाम्यांचे एकामागून एक धक्कादायक पुरावे समोर येत आहेत.

सोमवारी फॉरेन्सिक टीमने खरातच्या ऑफिसची झडती घेतली. यात अनेक संशयास्पद गोष्टी आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याची पोलीस कोठडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोर्टाने त्याला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाईल, यानंतर त्याची कोठडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.ऑफिसमध्ये सापडले संशयास्पद साहित्य

तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी खरातच्या सील केलेल्या ऑफिसची फॉरेन्सिक टीमद्वारे झाडाझडती घेतली. यावेळी पथकाला अनेक संशयास्पद वस्तू आढळल्या. यामध्ये भक्तांची नावे आणि तपशील असलेली डायरीही जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तिथे काळे पडलेले पेढे, काळ्या रंगाची फळे, बनावट खडे, औषधांची बाटली, गुन्ह्याशी संबंधित साहित्य, कागदपत्रं आणि काही तांत्रिक यंत्रे सापडली आहेत. ही सर्व सामग्री पोलिसांनी पुराव्यासाठी ताब्यात घेतली असून, अंधश्रद्धेचा आधार घेऊन तो लोकांना कसा फसवयचा? याचा उलगडा यातून होत आहे.

एसआयटीने आतापर्यंत गोळा केलेले वैज्ञानिक पुरावे आणि पीडितांचे जबाब अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. खरातच्या या कृत्यांमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का? आणि त्याने फसवणूक केलेली रक्कम कुठे गुंतवली आहे? याचा तपास अद्याप सुरू आहे. उद्या १ एप्रिल रोजी पोलीस खरातची पोलीस कोठडी वाढवून मागणार की त्याला न्यायालयीन कोठडी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!