राणे म्हणतात ‘मी बाळासाहेबांचा निष्ठावान शिवसैनिक’
नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर या 'शब्दात' टिका
मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निष्ठावान शिवसैनिक असल्याने आमच्यात बोलणं व्हायच, मात्र ते स्वतःच्या कर्तुत्वावर मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी यंदा दसरा मेळावा घ्यावा आणि मला त्या मेळाव्याला बोलावलं तर मी नक्की जाईल,असे केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले आहेत. स्वतः निष्ठावंत उल्लेख केल्याने वाद होण्याची शक्यता आहे.
नारायण राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर जोरदार टिका केली. उद्धव ठाकरेंच्या कामाचा विश्लेषण कराव असं काहीच नाही राज्याचे गेल्या अडीच वर्षात उत्पन्न किंवा जी.डी.पी वाढलाच नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. मराठी माणसांना नोकऱ्या मिळाल्या नाही. ठाकरे यांच सरकार निष्क्रिय सरकार होत. मी महाराष्ट्राच्या इतिहासात असं सरकार कधीच बघितलं नव्हतं, उद्धव ठाकरेंना लगावला. तर मुख्यमंत्री म्हणून सांगायचं झाल्यास, असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले नाही आणि परत कधी मिळूही नये. ते तीन तासापेक्षा जास्त वेळ ते मंत्रालयात ना कॅबिनेट न सभागृहात दिसत होते. असला मुख्यमंत्री काय कामाचा अशा शब्दात राणे यांनी ठाकरेंवर निशाना साधला.
दसरा मेळाव्याबद्दल बोलताना राणे यांनी एकनाथ शिंदेनी मेळावा घ्यावा कारण तेच खरे शिवसैनिक आहेत.उद्धव ठाकरेंचे विचार कुणाला घ्यायचे नाहीत. त्यांनी उध्वस्त महाराष्ट्र करण्याचं काम केलं आहे, असा हल्लाबोल केला आहे. या टीकेला शिवसेनेकडून प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता आहे.