
लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवून दहा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका व्यक्तीवर बलात्कार व फसवुणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मागील 14 वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी घडला आहे.याबाबत 37 वर्षीय महिलेने शनिवारी (दि.1) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सतिश दिलीप काळभोर (वय-36 रा. कुंजीरवाडी, पुणे) याच्यावर आयपीसी 376/2/एन सह 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोप सतीश काळभोर याचा आईस्क्रिम विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपी आणि महिलेची 2010 मध्ये ओळख झाली. सतीश याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेला. त्याठिकाणी महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर वेगवगेळी कारणे सांगून महिलेकडून दहा लाख रुपये घेतले. महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने टाळाटाळ केली. त्यामुळे फिर्य़ादी यांनी दहा लाख रुपये परत मागितले असता पैसे परत न करता व लग्न न करता फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.