Latest Marathi News
Ganesh J GIF

पुणे पोलीस दलातील भरती ‘या’ कारणामुळे स्थगित

पोलीस दलाने सांगितले महत्वाचे कारण, बघा काय आहेत कारणे

पुणे दि १८(प्रतिनिधी)- पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरूणांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण पुण्यातील पोलीस भरती २७ फेब्रुवारी पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. कसबा पोट निवडणुकीमुळे १८ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत होणारी पोलीस भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

पुणे पोलीस दलातील पोलीस शिपाई, चालक पदासाठी भरती प्रक्रिया शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात ३ जानेवारीपासून सुरू झाली आहे. मात्र कसबा पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पोलीस भरती प्रक्रिया १८ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस मुख्यालयाचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे.भाजपा आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे कसबा आणि चिंचवड या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्यामुळे पोलीस बंदोबस्त गरजेचा आहे. त्यात भरती प्रक्रिया सुरु ठेवणे शक्य नव्हते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात निवडणूक कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा एकदा भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात या भरतीची मैदानी चाचणी सुरु होत्या. या पोलीस भरतीला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात उमेदवार येत आहेत.

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर २ मार्च रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरूणांना आता काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!