
रूग्णालयात रिपोर्टरला हाॅस्पीटल स्टाफकडून बेदम मारहाण
मारहाणीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल, हा प्रश्न ठरला मारहाणीचे कारण, हाय होल्टेज ड्रामा बघाच!
लाहोर – रूग्णालयातील दुरावस्था आणि अपुरी उपचार व्यवस्था असे चित्र देशातील अनेक सरकारी रूग्णालयात आहे. त्यावर अनेकदा टीकाही झाली आहे. त्यामुळे अनेकांना आपला जीवही गमावावा लागला आहे. अशीच अवस्था आपला शेजारील देश पाकिस्तानातही आहे. तेथील एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पाकिस्तानच्या रुग्नालयातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये हॉस्पिटल स्टाफ आणि एका रिपोर्टरमध्ये वादावादी झाल्याचे दिसून येते, ज्यांनंतर स्टाफ मेंबर रिपोर्टरच्या अंगावर धावून येतो आणि जोरदार कानशिलात लागवतो. यानंतर तो इथेच थांबत नाही तर एकामागून एक चापट मारत रिपोर्टरची धुलाई केली आहे. एक रिपोर्टर एका रूग्णालयातील असुविधेवबद्दल बोलत असतो. त्यावेळी रूग्णालयातील एक कर्मचारी त्यांना येताना दिसतो. त्यामुळे रिपोर्टर त्यांना प्रश्न विचारतो. पण तो कर्मचारी संतापतो आणि थेट रिपोर्टरच्या कानशिलात लगावतो. यावेळी दोघांमध्ये जोरदार हाणामारी होते. दोघांमधील ही हाणामारी तेथील एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये शुट करत सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे. रिपोर्टरला ज्याप्रकारे मारले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. पण नक्की प्रश्न काय होता? आणि रूग्णालयात नेमके काय घडले होते. याबाबत कोणतीही माहीती मिळाली नाही. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हिडिओच्या शेवटी पोलिसांना बोलवण्यावर चर्चा झाली आहे. दरम्यान या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी रिपोर्टरवर जोरदार टिका केली आहे. तर काहींनी रूग्णालयातील कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.