Latest Marathi News
Ganesh J GIF

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर वार करत घातला दरोडा

दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद, दुचाकीत पेट्रोल भरले आणि पैसे देताच केले असे काही....

कराड- कराड तालुक्यातील वाठार पेट्रोल पंपवर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दोन दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यावर कोयत्याने वार करून सव्वा लाखाची रोकड घेऊन पोबारा केला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

वाठार हद्दीतील ऋषिकेश गावडे यांच्या गणेश पेट्रोल पंपावर सोमवारी मध्यरात्री कर्मचारी परशुराम दुपटे काम करत होते. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी परशुराम दुपटे यांच्याकडून दुचाकीमध्ये पेट्रोल भरून घेतले. त्यानंतर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवकाने दुपटे यांना पेट्रोलचे पैसे दिले, ते पैसे घेऊन दुपटे आपल्या जवळील बॅगमध्ये ठेवत असतानाच त्याच युवकाने खिशातून कोयता काढून दुपटे यांच्या अंगावर, पाठीवर, हातावर सपासप वार केले. वार चुकवत दुपटे यांनी तेथून पळ काढला. त्याचवेळी दरोडेखोराने दुपटे यांच्या हातातील बॅग हिसकावून घेऊन दुचाकीवरून तेथून पलायन केले. या बॅगमध्ये १ लाख २० हजार ९३५ रुपये होते. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पेट्रोल पंपावरील परशुराम सिद्धार्थ दुपटे हा कर्मचारी जखमी झाला आहे. महामार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपावर दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी दरोडा टाकल्याने खळबळ उडाली आहे.

 

पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची माहिती मिळताच कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच पुढील तपासाच्या अनुषंगाने पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!