
निर्दयी! सुनेची सासूला चपलेने बेदम मारहाण
बेदम मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, पण दीर आला आणि....
हरदोई- सासु सुनेचे नाते आई आणि मुलीसारखे असावे अशी अपेक्षा असते. पण काही ठिकाणी मात्र या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात सुनेने सासूला बेदम मारहाण केली आहे.
सुनेने सासूला भर रस्त्यात चपलेने बेदम मारहाण केली आहे. व्हिडिओत दिसत आहे की, म्हातारी सासू जमिनीवर बसली आहे आणि तिची सून तिला वारंवार चप्पलने मारत आहे. आजूबाजूला उभे असलेले लोक हे सर्व मूक दर्शक म्हणून पाहत आहेत पण कोणीही हस्तक्षेप करण्याचे धाडस करू शकत नाही. अचानक दीर रागात येतो आणि त्याच्या वहिनीला पाईपने बेदम मारहाण केली. पण सासू सुनेला का मारहाण का करत होती, याची माहिती मिळू शकली नाही. सध्या या प्रकरणी पोलिसात कोणीही तक्रार दाखल केलेली नाही. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरून शेअर केला आहे जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.
https://x.com/gharkekalesh/status/1956751334692237417?t=NLe_7YsMz3bFWyuk2sh9pw&s=19
या व्हिडिओवर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सासूला मारहाण केल्याबदल सुनेला शिक्षा करावी, अशी मागणी केली आहे. तर अनेकांनी दिराचे काैतुक केले आहे.