
बंद खोलीत निर्दयी बायकोची नवऱ्याला बेदम मारहाण
सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल, प्रेमविवाह असूनही वाद, पती ओरडत राहिला पण बायकोने...
सतना – मध्यप्रदेशातील सतना येथील नवरा बायकोमधील घरगुती भांडणाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात पत्नीने पतीला बेदम मारहाण केली आहे. पती जिवाच्या आकांताने ओरडत असतानाही ती पतीला मारहाण करत होती.
पती पत्नीची नावे समजू शकलेली नाहीत. पण दोघांचा २०१७ मध्ये प्रेमविवाह झाला होता. काही वर्ष व्यवस्थित गेली. पण त्यानंतर दोघांमध्ये वाद होऊ लागले पतीने आरोप केला आहे की पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध आहेत. तसेच पत्नी सतत फोनवर बोलत असते. शिवाय कोणालाही न सांगता ती अनेक दिवस घरीदेखील येत नाही. व्हायरल होत असलेला व्हिडिओ काही महिने आधीचा असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओमध्ये पत्नीने पतीला बेदम मारहाण केली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बायको पतीला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. तर पती तिला टाळत असल्याचे दिसते. त्याचवेळी तो खोलीचा दरवाजा उघडण्यास सांगताना दिसत आहे. मात्र, व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्यामुळे संतापलेल्या बायकोने खोलीचे दिवे बंद केले आणि नंतर पतीला मारहाण केली. यावेळी पती जिवाच्या आकांताने ओरडत असूनही बायकोने पतीला बेदम मारहाण केली आहे. यावेळी पतीने आईला मदतीसाठी हाक मारली पण बायकोने दरवाजा बंद केला असल्यामुळे आई देखील मदतीला येऊ शकली नाही. व्हिडिओत पती मी आता आत्महत्या करणार आहे असे म्हणताना दिसत आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून अनेकांनी बायकोवर संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.
नवरा बायकोतील वाद अनेक वर्षापासून सुरू आहे. आता हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. तर व्हायरल व्हिडिओच्या दृष्टीने कोणतीही तक्रार आली नसली तरी आमचा तपास सुरु असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.