Latest Marathi News
Ganesh J GIF

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड सुदर्शन घुलेला बेड्या

वाल्मिक कराड नंतर दोन आरोपींना पोलीसांनी केली अटक, आरोपींना अशी केली अटक

बीड – बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक महिना होत आला आहे. यातील चार आरोपींपैकी वाल्मीक कराड शरण आल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरत असून पोलीसांनी आता देशमुख हत्याप्रकरणात फरार असलेल्या ३ आरोपींपैकी दोघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

बीड पोलिसांच्या विशेष पथकाने सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना अटक केली आहे. सुदर्शन घुले हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. देशमुख यांचे अपहरण करणारा आणि टॉर्चर करुन त्यांचा खून करणारा तो मुख्य आरोपी आहे. याशिवाय, संतोष देशमुख यांचे लोकेशन हत्येच्या दिवशी देणाऱ्या आणखी एका संशयितालाही अटक करण्यात आली आहे. तिघाही आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. संतोष देशमुख रा.मस्साजोग यांचे खुनातील फरार आरोपी अटक करण्यासाठी बीड पोलीसाचे विशेष शोध पथक नेमण्यात आले होते. त्यांनी डॉ. संभाजी वायभसे याचेकडे चौकशी करुन घुले याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आरोपी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदारला याआधीच अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे अद्याप फरार होते. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. यापैकी आता सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात आली असून कृष्णा आंगळे अद्याप फरार आहेत. पकडलेल्या दोघांना आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.

संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. यानंतर हे सर्व आरोपी फरार होते. देशमुख यांच्या हत्येचे परिमाण संपूर्ण राज्यात उमटले होते. त्यामुळे आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात होती. या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी मार्फत केला जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!