
सतीश वाघ यांचेही बाहेर अनैतिक संबंध होते
पोलीस तपासात मोहिनी वाघ यांचा गाैप्यस्फोट, म्हणाली ''माझाही तो गेल्या दहा वर्षांपासून...
पुणे – भाजपचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची काही दिवसांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. त्यांची पत्नी मोहिनी वाघ यांनीच त्यांची हत्या केल्याचे समोर आले होते. पण आता त्यांची पत्नी मोहिनीने आपले मृत पती सतीश वाघ यांच्यावर आरोप केले आहेत.
मोहिनी वाघ यांना न्यायालयाने ३० डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. यावेळी चाैकशीत मोहिनी वाघ हिने सतीश वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सतीश वाघ यांचेही बाहेर अनॆतिक संबंध होते. माझाही तो गेल्या दहा वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ करीत होता. हा सर्व त्रास असह्य होता, असा खुलासा मुख्य आरोपी मोहिनी वाघ हिने पोलिसांच्या चौकशीत केला आहे. तसेच मोहिनीने अक्षय जावळकर याच्याशी संबंध असल्याचे कबूल केले आहे. तसेच मोहिनीने आपला पती सतीश वाघ याचा खुन करण्यास अक्षय जावळकर याला सांगितल्याचेही मान्य केले आहे. दरम्यान पोलीसांनी अतिश जाधव याला धाराशिव येथून ताब्यात घेतले होते. त्याच्या धाराशिव येथील घरातून त्याचे रक्ताने माखलेले कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत. अतिश जाधव याला अक्षय जावळकर याने खुन करण्यासाठी ५ लाख रुपये दिले. त्याबाबतचा तपास करण्यासाठी पोलिसांनी अक्षयची सर्व बँक खाती तपासण्यात आली आहेत, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी दिली आहे.
अक्षय जवळकर हा सतीश वाघ यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होता. या काळातच मोहिनी वाघ यांचे आणि अक्षयचे सूत जुळले होते. या सर्व गोष्टींमध्ये सतीश वाघ हे अडसर ठरत होते त्यामुळे त्यांची अपहरण करुन हत्या करण्यात आली.