पुणे – रस्त्याने जात असलेल्यांना तरुणांने पाहल्यावरुन माझ्याकडे काय पाहतो, असे म्हणून दोघांनी तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जबर जखमी केले आहे.
सोमनाथ कालिदास पवार (वय २१) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी साईनाथ लोंढे (वय २१) व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अरण्येश्वर समाज मंदिरासमोर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घराजवळील अरण्येश्वर समाज मंदिर येथे बसले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा व परिसरातील आरोपी तेथून जात होते. फिर्यादी यांनी त्यांच्याकडे पाहिले. तेव्हा साईनाथ पवार याने माझ्याकडे काय पाहतो, असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. साईनाथ याने त्यांच्याकडील लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण करुन त्यांना जबर जखमी केले. पोलीस हवालदार शिंदे अधिक तपास करीत आहेत.