यवतमाळ : अल्पवयीन मुला-मुलीने मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहून संबंध ठेवल्यानं मुलगी गरोदर राहिल्याचा प्रकार घडला आहे. अल्पवयीन लहान मुलं सोबत खेळतात यामुळे कुटुंबातील कुणालाच संशय आला नाही. पण अचानक मुलीच्या पोटात दुखायला लागले. तिला उलट्या सुरू झाल्यानंतर दवाखान्यात नेण्यात आलं. डॉक्टरांनी पोटदुखीवर उपचार केले. औषधे दिली तरी काही फरक पडला नाही. अखेर सोनोग्राफी करण्याचा निर्णय़ घेण्यात आला. सोनोग्राफी रिपोर्ट पाहताच मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याचं समजताच डॉक्टरांसह कुटुंबियांनाही धक्का बसला.
मुलीचा मामेभाऊ शिक्षणाच्या निमित्ताने त्यांच्याच घरी राहत होता. दररोज दोघेही शाळेत सोबत जायचे आणि सोबतच यायचे. अभ्यासही एकत्र करायचे. त्यामुळे पालकांनाही याबाबत काही कल्पना नव्हती. मुलीला अपचन झाल्यानंतर उलट्या मळमळ व्हायला लागली. तिला जास्त त्रास व्हायला लागल्यावर आईने डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी सुरुवातीला पोटदुखी थांबावी यासाठी औषधे दिली. पण औषधे घेऊनही त्रास थांबला नाही. डॉक्टरांना संशय आल्यानंतर त्यांनी मुलीची सोनोग्राफी केली. त्यात मुलगी गरोदर असल्याचं समोर आलं.
आईने मुलीला विश्वासात घेत तिच्याकडे चौकशी केली. त्यानंतर मुलीने आईला सर्व प्रकार सांगितला. शालेय मुलामुलींनी मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहून केलेल्या कृत्यातून घडलेल्या या प्रकारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मामेभावा विरुद्ध मुलीने तक्रार दिल्यानंतर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
जाहिरात