Latest Marathi News
Ganesh J GIF

पार्किंगच्या वादातून चावा घेत सचिवाच्या नाकाचा शेंडाच कापला

सोसायटीतील धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद, तरुणाचे धक्कादायक कृत्य, पोलिसात तक्रार दाखल

कानपूर – एखाद्या सोसायटीतील वाद नवीन आहेत. सोसायटी म्हटले की थोडे फार वाद होतातच. पण कानपूरल मध्ये मात्र एक विचित्र प्रकार समोर आला आहे. सोसायटीत पार्किंगवरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने सोसायटी सचिवाच्या नाकाचा चावा घेतल्याची घटना घडली आहे.

कानपूरमधील रतन प्लॅनेट सोसायटीत हा प्रकार घडला आहे. निवृत्त अभियंता आणि हाउसिंग सोसायटीचे सचिव रुपेंद्र सिंह यादव यांच्यावर सहकारी रहिवासी क्षितिज मिश्रा यांनी रागाच्या भरात हल्ला केला आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपार्टमेंटमधीलच रहिवासी क्षितिज मिश्रा यांनी त्यांच्या पार्किंग जागेत इतर कोणीतरी गाडी लावल्याची तक्रार केली. क्षितिज मिश्रा यांनी रुपेंद्र सिंह यादव यांना फोन करून ही तक्रार केली. यावर रुपेंद्र यांनी सुरक्षा रक्षकाला पाठवून गाडी काढायला सांगतो, असे सांगितले. पण क्षितिज यांनी यादव यांना स्वतःच खाली येण्याची सक्ती केली. रुपेंद्र सिंह यादव जेव्हा पार्किंग परिसरात आले, तेव्हा अचानक वाद वाढला. परिस्थिती चिघळली आणि क्षितिज मिश्रा यांनी यादव यांच्यावर हल्ला करत नाकाचा चावा घेतला. घाबरलेल्या रुपेंद्र यांच्या मुलांनी त्यांना त्वरित खासगी रुग्णालयात नेले. त्यानंतर रुपेंद्र सिंह यादव यांचे पुत्र प्रशांत यांनी यांनी भितूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून क्षितिज मिश्रा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये क्षितिज मिश्रा हे सचिवाला थप्पड मारताना आणि त्यांच्या मानेला पकडून नाक चावताना दिसत आहेत.

 

क्षितिज माझ्या पप्पांना मारू इच्छित होता. त्याने त्यांना यापूर्वीही धमकी दिली आहे. आता आम्ही पप्पांना प्लास्टिक सर्जरीसाठी दिल्लीला घेऊन जाणार आहोत, अशी माहिती मिश्रा यांच्या मुलाने दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!