
नवरीचा डान्स पाहून भर मांडवात पसरली नीरव शांतता
नवरीच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, नवरीच्या डान्सने माहोल बदलला, एकदा बघाच!
पुणे – अगोदरच्या काळात म्हणजे १५ ते २० वर्षापूर्वी लग्न म्हटले की, शुभ मुहूर्त, मानपान, लग्नातील विधी याकडे लक्ष दिले जायचे. परंतु आताच्या लग्नांमध्ये लग्नातील वधू-वराच्या एन्ट्रीचे डान्स, भन्नाट उखाणे, फोटो, व्हिडीओ याकडे अधिक लक्ष दिलं जाते. त्याचे प्रमाण वाढतच चालले आहे.
पावसाळा सुरु झाल्याने सध्या लग्नसराई संपत आली आहे, पण तरीही सोशल मीडियावरही लग्नातील अनेक हटके रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. कारण त्यातील अनेक व्हिडिओ लोकांच्या पसंतीस देखील उतरतात.लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक नवरी तिच्या एन्ट्रीला डान्स सुंदर करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नसोहळा पार पडत असलेल्या ठिकाणी नवरी आपला होणारा नवरा उभा असलेल्या स्टेजकडे जाता जाता सुंदर डान्स करते. यावेळी ती माझा होशील ना?’, या एका जुन्या मराठी मालिकेच्या शीर्षकगीतावर डान्स करते. तिचा हा डान्स चालू असताना मंडपात नीरव शांतता पहायला मिळते. कारण नवरी आपल्या होणाऱ्या नवरोबासाठी अतिशय प्रेमाने डान्स करत असते. नवरीचा मनमोहक डान्स सर्व पाहुणेमंडळी कौतुकाने पाहतात. सध्या सोशल मीडियावर तिचा हा डान्स खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @karmgraphy या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओवर आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. अनेकांनी नवरीचे काैतुक केले आहे.