राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील प्रमुख पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. आता सर्वच पक्षांचे जागावाटप जवळ-जवळ संपल्यात जमा आहे. शेवटच्या टप्प्यातील बाकी असलेल्या काही जागा जाहीर केल्या जात आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि पंढरपूर, अशा महत्त्वाच्या जागांचा पेच होता. अखेर हा पेच आता सुटला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांची पाचवी आज (दि. २९) नुकतीच जाहीर केली आहे. या यादीत पंढरपूर आणि माढा या मतदारसंघांसाठी उमेदवार देण्यात आले आहेत.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या पाच उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे.या पाच जागांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आतापर्यंत ८७ जागांसाठी आपले उमेदवार दिले आहेत. शरद पवार यांच्या पक्षाची ही शेवटची यादी असण्याची शक्यता आहे.
पाचव्या यादीत ‘यांना” उमेदवारी
माढा- अभिजीत पाटील
मुलुंड- संगिता वाजे
मोर्शी- गिरीश कराळे
पंढरपूर- अनिल सावंत
मोहोळ- राजू खरे