Latest Marathi News
Ganesh J GIF

अल्पवयीन मुलांच्या बॅगमध्ये आढळून आले धारदार कोयते ; तीन मुलांसह एकावर कारवाई

धारदार शस्त्राचा धाक दाखवून दहशत माजवित आणि धारदार कोयते घेऊन फिरणा-या तीघा अल्पवयीन मुलांसह एकाच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या.

संशयितांच्या बॅगमध्ये आढळून आलेले चार लोखंडी कोयते हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल गौतम वाघचौरे असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याचे अल्पवयीन तीन साथीदारांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत शहर गुन्हे शाखेचे युनिट १ चे पोलीस नाईक मिलींदसिंग परदेशी यांनी फिर्याद दिली आहे, कॉलेजरोडवरील मॉडेल कॉलनी भागात सोमवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास संशयित धारदार शस्त्राचा धाक दाखवून दहशत माजवित असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.

पथकाने धाव घेत संशयितांची अंगझडती घेतली असता एका संशयिताच्या पाठीला लावलेल्या सॅगमध्ये चार धारदार कोयते मिळून आले अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!