Latest Marathi News
Ganesh J GIF

मैत्रिणीसोबत लग्न करण्यासाठी तिनं केला लिंगबदल , नकार मिळताच घडलं भलतच…?

दोघी शालेय जीवनापासूनच्या खूप चांगल्या मैत्रिणी. पण पुढे जाऊन एकीचा दुसरीवर जीव जडला. त्यातून लिंग बदल शस्त्रक्रिया करुन घेतली. पण या सगळ्याचा खूप धक्कादायक, मन सून्न करणारा शेवट झाला. आपल्याच मैत्रिणीला 26 व्या वाढदिवशी संपवलं. चेन्नई जवळ थालांबूरमध्ये ही दुर्देवी घटना घडली. चेन्नई पोलिसांनी या प्रकरणी वेत्रीमारनला अटक केली आहे.

वेत्रीमारन MBA पदवीधर आहे. लिंग बदल शस्त्रक्रिया करण्याआधी वेत्रीमारनचं नाव पंडी मुरुगेश्वरी होतं. पोलिसांनी ही माहिती दिली. वेत्रीमारनने आर.नंदिनीची हत्या केली. वेत्रीमारनने स्वत:ची लिंग बदल शस्त्रक्रिया करुन घेतली. नंदिनी आणि मुरुगेश्वरी दोघी मदुराईच्या गर्ल्स स्कूलमध्ये होत्या. परस्परांच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या.

मुरुगेश्वरीला नंदिनी खूप आवडायची. म्हणून तिने स्वत:ची लिंग बदल शस्त्रक्रिया करुन घेतली. त्यानंतर नंदिनीला मागणी घातली. पण तिने नकार दिला. त्यानंतर दोघे टचमध्ये होते. पोलिसांनी ही माहिती दिली. माहिती-तंत्रज्ञानात बीएससी पदवी घेतल्यानंतर नंदिनीला आठ महिन्यापूर्वी चेन्नईत नोकरी मिळाली. ती तिच्या काकांसोबत राहत होती. शनिवारी वेत्रीमारनने तिला फोन केला व भेटायला बोलावलं. आपल्यासोबत काही वेळ घालवं असं त्याने सांगितलं.

दोघे भेटले. तो तिच्यासाठी नवीन कपडे घेऊन आला. वेत्रीमारन तिला थालांबूरच्या अनाथालयात घेऊन गेला. तिथे त्यांनी देणगी दिली. वेत्रीमारनन नंदिनीला तुला घरी सोडतो म्हणून सांगितलं. घरी जाताना त्याने एका निर्जनस्थळी गाडी थांबवली. वेत्रीमारनने तिला फोटोसाठी पोज द्यायला सांगितलं. त्याने बाईकरुन चेन आणली होती. त्याने नंदिनीचे हात बांधले. मजा-मस्ती सुरु आहे, असं त्याने सुरुवातीला दाखवलं. नंदिनीने नंतर विनवणी करुनही त्याने तिचे हात सोडले नाहीत. वेत्रीमारनने ब्लेडने तिचा गळा कापला. तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिलं. वेत्रीमारन नंतर तिथून पसार झाला. नंतर आसपासच्या लोकांनी पोलिसांना बोलावल. पोलिसांनी तिला सरकारी रुग्णालयात दाखल केलं. शनिवारी तिचा मृत्यू झाला. रविवारी पोलिसांनी वेत्रीमारनला पकडलं. नंदिनीचा मृतदेह रविवारी दुपारी चारच्या सुमारास तिच्या वाढदिवशी तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, वेत्रीमारनला नंदिनी हवी होती. इतर पुरुषांशी तिची मैत्री व्हावी याला वेन्निमारनचा विरोध होता. “गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून वेत्रीमारन तिच्याशी भांडत होता आणि तिने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. तिला एका पुरुष सहकाऱ्यासोबत वारंवार पाहिले जात असल्याने, वेत्रीमारनने तिच्या हत्येचा कट रचला, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

तिचा आरडाओरडा ऐकून रस्त्याने जाणाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता तिला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. त्यांनी रुग्णवाहिका बोलावली आणि पोलिसांना माहिती दिली. नंदिनीने त्यांना फोन नंबर दिला. जेव्हा ते डायल केले गेले, तेव्हा वेत्रीमारनने कॉलला उत्तर दिले आणि सांगितले की तो तिचा मित्र आहे. तो घटनास्थळी आला आणि पोलिसांना तिला रुग्णालयात नेण्यास मदत केली. मात्र, चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. वेत्रीमारन या प्रकारानंतर शांत आहे. त्याच्या मनात आपल्या कृत्याबद्दल कुठलीही पश्चातापाची भावना नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!