Latest Marathi News
Ganesh J GIF

“ती माझ्या भावाला बेडरूमध्येही येऊ देत नव्हती”

तरूणीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल, वहिणीवर केले गंभीर आरोप, म्हणाली ती आम्हाला...

दिल्ली – गेल्या काही दिवसांत देशभरातून पुरुषांवर पत्नीकडून होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. गेल्या महिन्यात बंगळुरू येथे इंजिनियर अतुल सुभाष यांनी पत्नी आणि सासरच्या लोकांवर मानसिक छळाचे आरोप करत आत्महत्या केली होती. आता अहमदाबादमधील आणखी एक प्रकरण समोर आले आहे.

सासरच्या घरात फक्त १० दिवस राहिलेल्या एका महिलेने संपूर्ण कुटुंब कसं उद्ध्वस्त करायला सुरुवात केली हे सांगणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सासरच्या घरात फक्त १० दिवस राहिलेल्या वहिनीने कसा त्रास दिला हे पदवीधर प्रत्युषा चल्ला यांनी या व्हिडिओत सांगितले आहे. व्हिडीओमध्ये प्रत्युषाने सांगितलं की, “हैदराबादमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक असलेल्या त्याच्या भावाने २०१९ मध्ये राजमुंदरी येथील एका महिलेशी लग्न केलं. हे लग्न फक्त १० दिवस टिकलं. भावाची पत्नी माझ्या पालकांशी गैरवर्तन करायची, त्यांना अपशब्द वापरायची, इतकेच नव्हे तर माझ्या भावाला बेडरूममध्येही येऊ देत नव्हती. ती अनेकदा आत्महत्येची धमकी देत ​​असे. माझ्या वहिनीने तिची बहीण, भाऊ आणि प्रियकराबरोबर आमच्याकडून खंडणी वसूल करण्याची योजना आखली होती. आमचे घर सोडल्यानंतर काही दिवसांनी, तिने आमच्याविरुद्ध कौटुंबीक हिंसाचाराची तक्रार दाखल केली. त्यानंतर कोणत्याही तपासाशिवाय आमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. असा आरोप प्रत्युषाने केला आहे. तसेच  ही घटना पाच वर्षांपूर्वीची असल्याचे सांगितले आहे. पाच वर्षे उलटूनही या खटल्याची सुनावणी सुरू झाली नसल्याने कुटुंबीयांना याचा त्रास होत असल्याचेही त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवीन चर्चेला तोंड फुटले आहे.

https://x.com/DeepikaBhardwaj/status/1877422593889947912?t=RCTWPq7F1Dbswxbc6koTHg&s=19

बंगळुरूमधील अतुल सुभाषच्या आत्महत्येनंतर लोकांनी संताप व्यक्त केला होता. तसेच पुरुषांवरील घरगुती हिंसाचाराबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान दिल्लीतही असेच एक प्रकरण समोर आले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!