Latest Marathi News
Ganesh J GIF

दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यास शिरूर पोलिसांना यश

पुणे ग्रामीण पोलीस दलातील शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्ड वरील दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यास शिरूर पोलिसांना यश आले आहे. प्रदिप उर्फ प्रदयुमन हरीश्चंद्र शिंदे असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर पोलीस हद्दीतील रेकॉर्डवरील पाहीजे फरारी असलेल्या आरोपीताबाबत पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम घेण्याबाबत आदेशीत दिले होते त्या अनुशंगाने शिरूर पोलीस पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिरूर पोलीस स्टेशन मध्ये फिर्यादी महंमद आलम अब्रार सि‌द्धिकी (वय ३२ वर्ष)यांनी दिलेल्या फिर्यादी वरून त्यांचा कोंबड्या घेवुन जाणाऱ्या टेम्पोवर आरोपी व त्यांचे इतर ७ साथीदारांनी दरोडा टाकला होता , यावेळी दरोडयामध्ये मिळालेल्या कोंबडयांपैकी १२४० कोंबडया के जी एल बॉयलर्स शॉप नं ७, शिरढोण, पनवेल रायगड यांना विक्री करून सदर विकीतुन आलेली ४,१८,३६० रू या रकमेपैकी २,८८,०००/- रू आरोपी यांनी वाटुन घेतले होते.हा गुन्हा घडल्यापासुन आरोपी प्रदिप उर्फ प्रदयुमन हरीश्चंद्र शिंदे हा फरार होता.

त्याचा शोध घेत असताना त्याला शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुप्त माहीतीचे आधारे शिकापुर परीसरातुन शिताफीने ताब्यात घेवुन त्यास अटक केली आहे.ही कामगिरी पोलीस अधिक्षक पंकज देशमुख ,अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले , पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहा पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी, पो. हवा. परशराम सांगळे, नाथसाहेब जगताप, विनोद मोरे, पोलीस अमंलदार विजय शिंदे, निरज पिसाळ, निखील रावडे, नितेश थोरात, सचिन भोई, रघुनाथ हळणोर, यांच्या पोलीस पथकाने केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!