Latest Marathi News
Ganesh J GIF

धक्कादायक! हडपसरमध्ये २१ वर्षाच्या तरुणाने डोक्यात गोळी झाडून केला आत्महत्येचा प्रयत्न

 २१ वर्षाच्या तरुणाने गावठी पिस्तुलातून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. विवेक वसंत कोकाटे ( वय २१) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे ही घटना त्याच्या राहत्या घरी शुक्रवारी दुपारी १२ वाजता घडली.

त्याच्यावर हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. कोकाटे याने प्रेमप्रकरणातून डोक्यात देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत मिळाली आहे अशी माहिती हडपसर पोलिसांनी दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेकने महिनाभरापूर्वी विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला हाेता. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास घरात कोणी नसताना त्याने गावठी पिस्तुलातून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. गोळीचा आवाज ऐकून त्याची आई विद्या कोकाटे यांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.याप्रकरणी अधिक तपास हडपसर पोलीस करीत आहेत

.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!