धक्कादायक! दर पाच मिनिटाला एका पुरूषाची आत्महत्या
आत्महत्येमागे 'हे' आहे मुख्य कारण, भारतात विवाहित महिलांपेक्षा...
बेंगळुरू येथील अतुल सुभाष या इंजिनिअरने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. अतुल बेंगळुरूमधील एका कंपनीत एआय इंजिनिअर म्हणून काम करत होता. पत्नी आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून अतुलने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुरूषांच्या छळाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे सरकार देखील चकित झाले आहे.
अतुल सुभाष याने एक व्हिडिओ बनवत आत्महत्या केली होती. त्यामुळे महिला अत्याचाराबरोबरच पुरुष अत्याचाराचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यातच एक आकडेवारी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO च्या मते, महिलांपेक्षा पुरुष जास्त आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे. भारतातील NCRB च्या अहवालानुसार, आत्महत्या करणाऱ्या प्रत्येक १०० लोकांपैकी ७० पुरुष आहेत. NCRB च्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये भारतात १,६४,०३३ लोकांनी आत्महत्या केल्या, ज्यापैकी १,१८,९८९ म्हणजेच ७३% पुरुष होते. तर त्यात फक्त ४,५०,०२६ महिला होत्या. या आकडेवारीनुसार दर ५ मिनिटाला एका व्यक्ती आत्महत्या करत असल्याचे सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे बहुतांश आत्महत्या प्रकरणांमध्ये ३० ते ४५ वयोगटातील लोकांचा समावेश आहे. त्यातही महत्वाचे म्हणजे अहवालानुसार, ८१,०६३ विवाहित पुरुषांनी आत्महत्या केल्या आहेत. तर या काळात आत्महत्या केलेल्या विवाहित महिलांची संख्या २८,६८० इतकी होती. या आकडेवारीनुसार, विवाहित स्त्रियांपेक्षा विवाहित पुरुषांनी आत्महत्या केल्याचे उघड आहे. मागील पाच वर्षांच्या काळात दर १ महिलेच्या तुलनेत २.४४ पुरुषांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
देशातील गुन्ह्यांशी संबंधित आकडेवारी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणजेच NCRB द्वारे जाहीर केली जाते. २०२१ च्या NCRB अहवालात विवाहित महिलांच्या तुलनेत विवाहित पुरुषांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे महिला आयोगाप्रमाणे पुरुष आयोग सुरु करण्याची मागणी होत आहे.