रस्त्यात पडलेल्या पेवर ब्लॉकने मारहाण करुन एका तरुणाचा निर्घुण खून करण्यात आला.अली अन्सारी (वय ३५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक श्र्वेता रंजित घोरपडे (वय ३४) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना थेरगावमधील काळेवाडी फाटा ते तापकरी चौक दरम्यान तुळजा भवानी पानशॉपचे शेजारी ९ सप्टेबर रोजी साडेआठ वाजण्याच्या अगोदर घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजा भवानी पान शॉपजवळ फुटपाथवर एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला नागरिकांनी दिली.
त्यानुसार वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एका तरुणाच्या डोक्यात पेवर ब्लॉकने मारहाण केल्याचे दिसून येत होते. त्यातच त्याचा मृत्यु झाला होता. अली अन्सारी असे खून झालेल्याचे नाव समजले असून सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.