धक्कादायक! संशयातून झोपेतील तरुणीवर वार करत निर्घुण हत्या
तपासासाठी पोलीसांनी जंग जंग पछाडले, हत्येचे कारण समोर आल्यावर पोलिसही थक्क, त्या दिवशी काय घडले?
गडचिरोली दि ४(प्रतिनिधी)- गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम रंगय्यापल्ली गावात एका तरुणीची हत्या उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. अखेर पोलीसांनी हत्येचा उलगडा करण्यात यश आले असून आरोपीला यश आले आहे. हत्येचे थक्क करणारे कारण समोर आला आहे.
ओलिता रामया सोयम असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. तर स्वामी मलय्या आत्राम असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम रंगय्यापल्ली गावात १३ जुलै रोजी १९ वर्षीय तरुणीची हत्या झाली होती. ओलिताचा भाऊ बुचया रामया सोयम झोपेतून उठला आणि अंथरुण पांघरुण ठेवण्यासाठी आतील खोलीत गेला. यावेळी खाटेखाली रक्त आढळल्याने हा खुन उघडकीस आला होता. घटनेची माहिती मिळताच सिरोंचा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा तपास सुरु केला. पोलीसांनी ८० संशयीत तपासले पण कोणताही पुरावा हाती लागत नव्हता. पण एका महिलेने तरुणी आणि तिच्या मामेभावाच्या भांडणाबाबत सांगितले. यानंतर पोलिसांनी मामेभावाला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली त्यामुळे पोलीस देखील हादरले. स्वामी मलय्या आत्राम हा दारुच्या आहारी गेलेला आहे. पत्नी रोजंदारीने काम करते. त्यांना दोन मुले आहेत. मृत ओलिता व स्वामीचे घर जवळच आहे. नातेवाईक असल्याने घरी येणे-जाणे होते. ओलिताचे पत्नीकडे सतत येणे त्यास आवडत नसे. ओलिताचा फोन पत्नीने वापरण्यासाठी घेतला होता, त्यामुळे त्याने पत्नीला टोकले होते. शिवाय ओलिताच्या घरी जाऊन तिच्या आईलाही त्याने आमच्या घरी ओलिताला येऊ देऊ नका, असे बजावले होते. घटनेच्या दिवशीही आरोपी आणि मयत तरुणीमध्ये वाद झाला होता. त्यामुळे संतापलेला स्वामी ओलिताच्या घरी गेला. दरवाजा फक्त लोटलेला होता. तो ढकलून आत शिरला व झोपेत असलेल्या ओलितावर चाकूने वार करुन तिचा खून केला. त्याचा राग इतका टोकाचा होता की, स्वामी ओलिताच्या अंत्यसंस्काराला किंवा तिच्या कुटुंबीयांनाही तो भेटायला गेला नाही.
पोलिस निरीक्षक विश्वास जाधव, उपनिरीक्षक शीतल धविले, दिनेश कोळी, हवालदार राजू चव्हाण, शिपाई बाजीराव मुंडे, शत्रुघ्न भोसले, सुनील घुगे, प्रकाश मोरे, राकेश नागुला यांच्या फरकाने ही कारवाई केली. पोलीसांनी अवघ्या २० दिवसातच आरोपीला अटक केली.