
शिरूर पोलीस स्टेशनमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून यामध्ये एका महिलेने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार घराशेजारील शाळेत रात्रीच्या वेळेस डीजे चा आवाज चालू असल्याने व त्याचा आपल्या मुलांच्या अभ्यासात अडथळा येत असल्याने जाब विचारायला गेलेल्या महिलेला व तीच्या तरूण मुलाला शाळेत शिवीगाळ करून, धमकावल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी शाळेतील शिक्षकासह १५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. शाळेतील शिक्षक दारूच्या नशेत होते, असा आरोप फिर्यादी महिलेने केल्याने व तक्रार दाखल करण्यास पोलीस मदत करत नसल्याने पोलिस ठाण्यासमोर अंगावर रॉकेल ओतून घेतल्याने खळबळ उडाली आहे.
सध्या शिरूर तालुक्यातील पोलीस स्टेशन मध्ये नागरिकांना सन्मान जनक वागणुक मिळत नसल्याने अनेक वेळा नागरिकांना पोलिसांच्या विरोधात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे कार्यालय गाठावे लागत आहे, तर तेथे निवेदन देऊन ,काही वेळा आंदोलन देखील करावी लागत आहे,तर कधी महिलेला अंगावर डिझेल ओतून घेऊन टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे, त्यानंतर कुठं तक्रारदाराची तक्रार दाखल करून घेतली जाते ,त्यामुळे शिरूर तालुक्याती पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, याबाबत आता पुणे पोलीस ग्रामीण अधीक्षक पंकज देशमुख यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे नागरिक बोलून दाखवत आहे.