Latest Marathi News
Ganesh J GIF

धक्कादायक ! पुण्यात विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची गाडी पेटवली; आरोपी पोलिसांच्या ताब्यात, नेमके कारण काय ?

पिंपरी-चिंचवडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील शासकीय कार्याललयात विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांची गाडी पेटविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दृष्टिहीन उमेदवार विनायक ओव्हाळ यांना काळेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, ओव्हाळ यांनी हे पाऊल का उचललं याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

या घटनेत अनिल पवार यांच्या खाजगी गाडीचे मागच्या चाकाजवळील भागाचे नुकसान झाले आहे. ओव्हाळ यांनी गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न का केला, याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. उमेदवारी अर्जाबाबत दोघांमध्ये काही वाद झाला होता का, याबाबत पिंपरी चिंचवडमध्ये चर्चा सुरू आहे. वारंवार पाठपुरावा करून ही रमाई आवास योजनेत घर मिळालं नाही, रसवंती आणि फटाका स्टॉल लावण्यास परवानगी दिली नाही. तसेच पालिकेच्या थेरगाव रुग्णालयात कॅन्टीनला लावण्याची परवानगी दिली नाही, यामुळं ओव्हाळ यांनी गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेत विनायक ओव्हाळ यांच्यासोबत आणखी दोघे उपस्थित होते. नागेश काळे हे दिव्यांग आणि अजय गायकवाड अशी त्यांची नावं आहेत. काळे सुद्धा दिव्यांग असून त्यांच्याच रिक्षातून ओव्हाळ ग प्रभागात आले होते. काळे यांचं घरकुल योजनेतून मिळणारे घर प्रतीक्षेत आहे, तर गायकवाड यांनी ओव्हाळ यांना पवारांच्या कार्यालयात नेहण्याचं अन् खाली आणण्याचे काम केलं. थेरगाव रुग्णालयात प्रचंड लूट होते, ही लूट थांबवावी म्हणून ते पालिकेकडे पाठपुरावा करत आहेत. या सगळ्या प्रलंबित मागण्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर मान्य होतील, या अपेक्षेने त्यांनी हे नको ते पाऊल उचललं आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!