Latest Marathi News
Ganesh J GIF

धक्कादायक! भाजपा नेत्याचा पत्नी आणि मुलांवर गोळीबार

गोळीबारात तीन मुलांचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी, या कारणामुळे केला नेत्याने गोळीबार

सहानपूर- उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील गंगोह शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका भाजप नेत्याने स्वतःच्या घरात अंदाधुंद गोळीबार करत स्वतःची पत्नी आणि तीन मुलांची हत्या केली आहे.

भाजपा नेता योगेश रोहिला याने आपल्या परवानाधारक बंदुकीतून हा गोळीबार केला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने ही घटना घडली आहे. शनिवारी दुपारी रोहिला याची पत्नी बरोबर भांडण झालं. त्यानंतर दुपारच्या सुमारास त्याने त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलने पत्नी नेहा, मुलगी श्रद्धा, मुलगा शिवांश आणि देवांश यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळ्या त्याने त्यांच्या थेट डोक्यात झाडल्या. या हल्लानंतर सर्व जण खाली कोसळले. गोळ्यांच्या आवाजाने गावात एकच धावपळ उडाली. या गोळीबारात मुलांचा मृत्यू झाला असून पत्नी नेहावर उपचार सुरु आहेत. योगेश रोहिला हा भाजपच्या जिल्हा कार्यकारणीचा नेता आहे. घटनेनंतर पोलिसांनी लगेचच आरोपी भाजप नेता योगेश रोहिला याला अटक केली आहे. हत्या केल्यानंतर योगेश यानेच पोलिसांनी फोन करून आपण हत्या केल्याचे सांगितले. शिवाय त्याने आपला गुन्हा देखील कबुल केला आहे. तो आपल्या पत्नीवर संशय घेत होता असं त्याने चौकशीत सांगितले. विशेष म्हणजे पत्नी आणि मुलांवर गोळ्या झाडल्याचा त्याला पश्चाताप नाही असेही पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान पत्नीला गोळी मारल्यानंतर पुढे मुलांच काय होणार? म्हणून त्याने मुलांना सुद्धा गोळी मारली, असे त्याने चाैकशीत सांगितले आहे.

पोलीस या प्रकरणातील पुढील तपास करत आहेत. यात काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. दरम्यान आरोपी योगेश रोहिला याची पत्नी नेहा यांच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत, पण त्यांची प्रकृती गंभीर आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!