
धक्कादायक! सुनेची सासूला आणि पतीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, सुनेला माहेरच्यांची साथ, मारहाणीचे धक्कादायक कारण समोर
ग्वालेर – सासूला नवरा वृद्धाश्रमात पाठवत नसल्याने संतापलेल्या पत्नीने माहेरच्या माणसांना बोलावून सासु आणि नवऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
ग्वाल्हेरमध्ये राहणारा विशाल बत्रा हा कारच्या सुटे भागांचे दुकान चालवतो. आदर्श कॉलनीमध्ये त्याचे घर आहे आणि त्याची किंमत सुमारे २-३ कोटी रुपये असल्याचे सांगितले. तो त्याच्या आई सरला बत्रा, पत्नी आणि दोन मुलांसह राहतो. विशालनं केलेल्या दाव्यानुसार सकाळी-सकाळी तिच्या माहेरची मंडळी आले आणि त्यांनी मारहाण सुरु केली. सर्वात प्रथम सासऱ्यांनी हात उचलला. आम्ही विरोध केला तर त्यांनी मारहाण सुरु केली. विशालच्या आई सरला मुलाला वाचवण्यासाठी आल्या तर त्यांची सून बाहेर आली आणि तिने सासूला मारहाण सुरु केली. हे सर्व जण मारहाण करत रस्त्यावर आले. त्यांनी तिथंही जोरदार मारहाण केली. आरोपी सून सासूला मारहाण करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. शेजाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. सासू सरला बत्रा यांनी सांगितले की, त्यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. ती तिचा मुलगा विशाल बत्रा आणि सून नीलिका आणि मुलांसह राहते. सुनेला तिला घरात ठेवायचे नाही आणि ती मला वृद्धाश्रमात पाठवण्याची सुनेची इच्छा आहे. पण माझ्या मुलाला हे अजिबात मान्य नव्हते. सून संपूर्ण मालमत्ता तिच्या नावावर करा अशी मागणी करत होती असेही सांगण्यात येत आहे. यावरून त्यांच्यात अनेकदा वाद होतात. दरम्यान माझ्या आणि आईच्या जीवाला धोका असल्याचा दावा त्यांनी केला. पत्नीनं घरावर कब्जा केला असून आपण दारोदारी वणवण करत आहेत, अशी आप बीती सांगितली आहे.
https://x.com/ashutoshjourno/status/1908123958471262332?t=vGFmbnMEyAp6JzBZ7jNgsg&s=19
विशाल बत्रा २ एप्रिल रोजी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर विशाल बत्रा यांनी एसपी कार्यालयात जाऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे. यावर डीएसपी रॉबिन जैन यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणातील आरोपी पत्नीची बाजू अद्याप समजू शकलेली नाही.