Latest Marathi News
Ganesh J GIF

धक्कादायक! पिंकी ताईमुळे वैष्णवी हगवणेने केली आत्महत्या?

लेडी व्हिलन करिश्मा हगवणे आहे तर तरी कोण?तिचा व्यवसाय काय? पिंकीचे काळे कारनामे

मुख्य- वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात संपूर्ण हगवणे कुटुंबच चौकशीच्या केंद्रस्थानी आहे. विशेषतः वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणे म्हणजेच पुंजी ताई ही या प्रकरणातील एक महत्त्वाची आणि वादग्रस्त व्यक्ती बनली आहे. घरातील या वादाचे मुळ कारण करिश्मा असल्याचे सत्य आता समोर येऊ लागले असून तिचे काळे कारनामे देखील उघड होत आहेत.

वैष्णवीची थोरली सून मयुरी जगताप आणि वैष्णवीच्या वडिलांनी करिश्मावर थेट मानसिक व शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. इतकेच नव्हे तर वैष्णवीच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्येही नणंदेने त्रास दिल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे याच करिश्माने उलट आपल्या भावजयी विरोधात महिला आयोगात तक्रार दाखल केली होती. करिश्मा हगवणे ही फॅशन डिझायनर असून ‘लक्ष्मीतारा’ या नावाने तिने स्वतःची डिझायनिंग कंपनी आहे. करिश्मा घरात सगळ्यात मोठी आहे. पण तिने लग्न केले नाही. करिश्माचा आपल्या आई-वडिलांवर पूर्ण ताबा होता. घरातली मोठी असल्याने ती लाडाची होती. हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरीच्या म्हणण्यानुसार, तिचे सासू आणि सासरे करिश्माच्या सांगण्यानुसार वागत असत. संपूर्ण हगवणे कुटुंबावर तिची सत्ता होती, त्यामुळे साहजिकच घरातील सर्व निर्णय तिच्या हाती होते. घरात कुणी कुणाशी कसे वागायचे हे तीच ठरवत होती. धक्कादायक बाब म्हणजे, वैष्णवी आणि मोठी सून मयुरी या एकाच छताखाली राहत असतानाही करिश्माने त्यांना एकमेकींशी बोलू दिले नाही आणि भेटण्यासही मनाई केली होती. वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी करिश्माने तिला धमकावले, गरोदर असताना उन्हात उभे केले, तिला त्रास दिला असा आरोप आहे. तिच्या अंगावर थुंकत तिला मारहाण केली. नंतर माहेरी मारत आणून सोडले. माहेरी आणतानाही गाडीत वैष्णवीला मारहाण केली. वैष्णवीच्या आत्महत्येवेळी तिचे शरीर मारहाणीमुळे पूर्ण काळानिळे पडले होते. पोस्टमार्टम अहवालात देखील तसा उल्लेख करण्यात आला आहे. करिश्मा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रीय होती. तिचे अनेक फोटो शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पुण्यातील कोथरूड येथे ‘लक्ष्मीतारा’ या बुटिकच्या उद्घाटनासाठी तिने सुनेत्रा पवार यांना आमंत्रित केले होते, ज्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. सुप्रिया सुळे यांनाही निमंत्रण देण्यात आले होते.

करिश्मा स्वतः ३४ वर्षाची होती तरी देखील तिने लग्न केले नव्हते. त्याचबरोबर तिने आपल्या भावांचा संसार देखील होऊ दिला नाही. सध्या करिश्मा हगवणे पोलिस कोठडीत असून तिच्यावर गंभीर आरोप आहेत. आता पोलीस या प्रकरणी करिश्मावर कोणत्या कलमतर्गत कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!