बंगळुरू- आपल्या स्वत:च्या आईची हत्या करुन मृतदेह सुटकेसमधून पोलीस ठाण्यात आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बेंगळुरु येथील आहे. या प्रकरणी एका ३९ वर्षीय महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथे सोमवारी एका ३९ वर्षीय महिला फिजिओथेरपिस्टने आधी आईची हत्या केली, नंतर मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरून पोलीस ठाणे गाठले. सुटकेसमध्ये मृतदेह पाहून पोलिसांचेही कान उभे राहिले. ही घटना बंगळुरूमधील एका निवासी अपार्टमेंटमधील आहे. सेनाली सेन असे आरोपी महिलेचे नाव आहे.
सेन आणि त्यांच्या आईमध्ये काही कारणावरून वाद झाला होता. काही वेळातच परिस्थिती इतकी वाढली की रागाच्या भरात महिला फिजिओथेरपिस्टने आईचीच हत्या केली. महिला फिजिओथेरपिस्टने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिने सांगितले की त्याची आई आणि त्यांच्यात वारंवार वाद व्हायचे.
पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. महिलेविरुद्ध भादंवि कलम ३०२ व इतर कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. या घटनेमागे आणखी काही कारण आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. त्या सुटकेसचा व्हिडिओही समोर आला आहे, यामध्ये मृतदेह भरून महिला पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली होती.
पोलिसांनी महिलेची चौकशी सुरू केली. यात आरोपी महिला पश्चिम बंगालची रहिवासी आहे आणि सध्या ती तिच्या आईसोबत बेंगळुरू येथे एका फ्लॅटमध्ये राहत होती. आरोपी विवाहित असून घटनेच्या वेळी तिचा पती घरी नव्हता. घटनेच्या वेळी महिलेची सासूही तिथे हजर होती, पण सेनने एका खोलीत ही हत्या केल्याची माहिती समोर आली.