Latest Marathi News
Ganesh J GIF

बेबीडाॅल अर्चिता फुकन प्रकरणात धक्कादायक कांड समोर

इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल झालेली अर्चिता आहे तरी कोण? फुकनच्या त्या फोटोंचं गुपित चकित करणारे?

आसाम – गेल्या काही दिवसांपासून अर्चिता फुकन हे नाव सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवर तिचं बेबीडॉल आर्ची या नावाने खातं आहे. या खात्यावर तिचे लाखोंनी फाॅलोअर्स आहेत. मात्र आता तिच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे एआयवर चर्चा होत आहे.

प्रेमप्रकरणाचा शेवट झाल्याने दुखावलेल्या एका तरूणाने एआयच्या मदतीने हे कांड करण्यात आले असल्याचे सत्य समोर आले आहे. आसाम राज्यातील डिब्रूगड या भागातून प्रीतम बोरा याला अटक करण्यात आली आहे. प्रीतम हा अर्चिता फुकन हिचा एक्स बॉयफ्रेंड आहे. त्यानेच अर्चिता फुकन हिचे सोशल मीडियावर बनावट खाते चालू केले होते. गेल्या अनेक आठवड्यांपासून तो अर्चिता फुकनचे फेक अकाऊंट चालवत आहे. प्रीतम हा पूर्वी अर्चिता फुकनचा एक्स बॉयफ्रेंड आहे. अर्चिताला बदनाम करण्यासाठी आणि तिला त्रास देण्यासाठी प्रतीमने हे कृत्य केले, असे पोलिसांनी सांगितले. प्रतीम पेशाने मॅकेनिकल इंजिनीअर आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर अर्चिताच्या भावाने पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीनंतर आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. बोराने फुकनचा चेहरा प्रौढ कंटेंटवर मॉर्फ करण्यासाठी मिडजर्नी एआय, डिझायर एआय आणि ओपनआर्ट एआय सारख्या एआय टूल्सचा वापर केला, बनावट सोशल मीडिया प्रोफाइल तयार केले आणि सबस्क्रिप्शनमधून सुमारे ₹१० लाख कमावले. अर्चिता फुकन ही ‘बेबीडॉल आर्ची’ या नावानेही ओळखली जाते. ‘Dame Un Grrr’ रीलमुळे ती इंस्टाग्रामवर प्रसिद्ध झाली. फुकनने बोराविरुद्ध औपचारिक एफआयआर दाखल केला, ज्यावर सायबर छळ, बदनामी आणि गोपनीयतेचे उल्लंघन यासह भारतीय दंड संहिता आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अर्चिता  फुकन ही सोशल  मीडियावर बेबीडॉल आर्ची या नावाने प्रसिद्ध आहे. तिने सांगितल्यानुसार  एका फेक अकाउंटवर अर्चिता आणि अमेरिकेतली एका अडल्ट स्टारसोबत मॉर्फ केलेले फोटो अपलोड करण्यात आले होते. हे फोटो अर्चिताचे मित्र तसेच जवळच्या लोकांपर्यंत पोहोचले. त्यानंतर हा सर्व प्रकार अर्चिताला समजला.

बनावट कंटेंट फॉरवर्ड करताना किंवा त्यावर अपमानास्पद टिप्पणी करताना आढळणाऱ्या कोणालाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. यामुळे तंत्रज्ञानाचा दुष्परिणाम समोर आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!