Latest Marathi News
Ganesh J GIF

धक्कादायक! पेट्रोल पंप चालक महिलेला गुंडांनी पाया पडण्यास भाग पाडले

महिलेवर दमदाटी करण्याचा व्हिडिओ व्हायरल, राज्यात लाडकी बहीण असुरक्षित

नागपूर – महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. गृह माथ्यावरून महायुतीत वाद होत असताना त्याच गृह खात्यातील निष्क्रियता समोर आली आहे. महाराष्ट्रात अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. आता तर मुख्यमंत्र्यांच्या घराच्या नागपूरमध्ये महिला पेट्रोल पंप चालकाला मारहाण करण्यात आली आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सुचित्रा लोहकरे असे पेट्रोप पंपावर काम करणाऱ्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील इलेक्ट्रिक झोन चौकातील पंपावर सुचित्रा लोहकरे काम करत होत्या, यावेळी पेट्रोल भरण्यासाठी एका दुचाकीवरून दोन तरुण पंपावर आले. पण हे तरुण काम नसताना इकडे तिकडे फिरू लागले होते. त्यामुळे पीडित पेट्रोल पंप संचालिका महिलेने त्यांना हटकले. त्यामुळे त्या तरूणांनी महिलेसोबत वाद घातला. त्यावेळी इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने ते तरुण निघून गेले. पण काहीवेळाने ते तरुण पुन्हा आपल्या साथीदारांसोबत आले, आणि पंपावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. इलेक्ट्रिक झोन चौकावर आमची दादागिरी चालते, इथे एवढा मोठा कोण झाला आहे, जो आमच्या लोकांना दमदाटी करेल” असं धमकावत या तरुणांनी पेट्रोल पंपाच्या संचालिकेला माफी मागण्यासाठी दबाव टाकला. काही अनुचित घडू नये म्हणून
या महिलेने माफी मागितली. पण राजेश मिश्रा याने तरूणांच्या पायावर डोके ठेऊन माफी माग असे सांगितले. या महिलेनं हात जोडून माफी मागितली. पण तरीही हे गुंड काही ऐकायचं नाव घेत नव्हते. त्यामुळे जमावाच्या दबावापुढे नमतं घेत या महिलेला गुंडाच्या पायावर लोटांगण घालत माफी मागावी लागली. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ कोणीतरी व्हायरल केला आहे. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी 7 तरुणांना ताब्यात घेतले आहे. विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले असून अधिक तपास करत आहे.

 

नागपुरात गेल्या आठवडाभरापासून हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे सर्व नेतेमंडळी नागपूरमध्ये उपस्थित आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. असे असतानाही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात लाडकी बहिण असुरक्षित असल्याचे समोर आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!