Latest Marathi News
Ganesh J GIF

धक्कादायक! भरदिवसा रेल्वे स्टेशनवर दोघांनी केले तरुणीचे अपहरण

अपहरणाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, धक्कादायक कारण समोर, एकाला अटक

नांदेड – नांदेड शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा दोन तरुणांनी एका तरुणीला जबरदस्तीने उचलून नेताना दिसत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना नांदेड रेल्वे स्थानक परिसरात घडल्याचं स्पष्ट झालं असून या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नांदेड पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि अपहरण झालेल्या मुलीचा सुखरूप सुटका केली. अपहरण झालेली मुलगी रेल्वे स्टेशन परिसरातच वास्तव्यास असून, ती भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होती. आरोपी आणि पीडित मुलीची पूर्वीपासून ओळख होती. अपहरणाच्या दिवशी आरोपींनी मुलीशी वाद घातला होता. वादानंतर एक आरोपी आपल्या मित्रासोबत आला आणि दोघांनी मिळून तिला दुचाकीवरून बळजबरीने पळवून नेले. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने तपासाला लागले. या अपहरणाच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दुचाकीवरुन तरुणीला घेऊन जाणाऱ्या दोघांचा पाठलाग केला. पोलीस पाठलाग करत असल्याचं समजताच आरोपींनी तरुणीला गोकुळनगर भागातील रेल्वे स्टेशन परिसरात सोडून तेथून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी घटनेच्या काही तासातच २१ वर्षीय आरोपीला देगलूर नाका भागातून अटक केली. यानंतर पोलिसांनी ती मुलगी सुखरूप शोधून काढली. मुलीवर कोणताही अत्याचार झाला नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एक आरोपीला अटक केली असून, दुसऱ्या आरोपीची ओळख पटली आहे आणि त्याचा शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान रेल्वेस्थानकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा हा प्रकार सुरू होता. विशेष म्हणजे, अनेक प्रत्यक्षदर्शींनी तो पाहिला, परंतु मुलीला सोडविण्यासाठी कोणीही विरोध केला नाही.

 

सार्वजनिक ठिकाणी, तेही दिवसा, अशा प्रकारे एखाद्या मुलीचं अपहरण होणं ही अतिशय गंभीर बाब मानली जात आहे. स्त्रियांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. सोशल मीडियावर नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत असून, पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!