Latest Marathi News
Ganesh J GIF

धक्कादायक!वैष्णवी हगवणेची आत्महत्या नाहीतर हत्या

पोस्टमार्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा, आॅडिओ क्लिप व्हायरल, म्हणाली शशांक माझा झाला नाही....

पुणे – पुण्यातील अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सुन वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. वैष्णवीची हत्या झाल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. पण आता पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर आता या संपूर्ण प्रकरणाचा धक्कादायक तपशील आता समोर आला असून त्यात धक्कादयाक खुलासे झाले आहे. तसेच शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू मारहाणीमुळे देखील झाल्याचा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे. बीजे हॉस्पिटलने दिलेल्या अहवालनुसार, वैष्णवीचा मृत्यू गळ्याजवळ झालेल्या फासाने झाला आहे. तिच्या मृतदेहावर धारदार वस्तूने वार केलेल्या खूप साऱ्या जखमा देखील आढळून आल्या आहेत. तूर्तास वैष्णवी हिच्या शवविच्छेदनाचे सॅम्पल विसेरा हे राखून ठेवल्यात आले आहेत. तसे या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता नेमके काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, वैष्णवी हगवणे हिची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ती तिच्या सासरच्या मंडळींबद्दल बोलताना दिसत आहे. तसेच तिने तिचा पती शशांक याचाही या ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख केला आहे. माझा नवरा माझा कधीच होऊ शकला नाही. त्यामुळे घटस्फोट घेणार असल्याचे ती बोलत आहे.

राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून ५१ तोळे सोने, फॉरच्युनर गाडी, चांदीची भांडी घेतली. एवढंच नाही तर सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करुन देण्याच्या बोलीवर मुलीशी लग्न करुन दिलं, अशी माहिती एफआयरमधून समोर आली आहे. सध्या सासरे आणि पती फरार असून पोलीस शोध घेत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!