Latest Marathi News
Ganesh J GIF

परळीतील विधानसभा निवडणूकीत धक्कादायक व्हिडिओ समोर

धनंजय मुंडे समर्थकांकडून बुथ ताब्यात घेत पोलीस नागरिकांना मारहाण, धनंजय मुंडे अडचणीत

मुंबई – राज्यामध्ये सध्या बीड हत्या प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घुण हत्येमुळे राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पण आता विधानसभा निवडणूकीतील एक व्हिडीओ समोर आल्यामुळे वादंग निर्माण झाले आहे.

शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये मतदान केंद्रात गाडी आणण्यास परवानगी नसताना देखील चारचाकी गाडी आत घेऊन आलेले असून १५ ते २० तरुण दमदाटी करत आहेत. यावेळी ते धनंजय मुंडे यांच्या नावाच्या घोषणा देत आहेत. तसेच हे तरुण मतदारांना दमदाटी करत आहेत. या जमावाला पोलिसांचा देखील धाक राहिलेला नाही. जमाव पोलिसांवर आरेरावी करत असून पोलिसांचा एकेरी उल्लेख करत आहे. यावरुन परळीमधील परिस्थिती स्पष्टपणे दिसून येत आहे. असा दावा आव्हाड यांनी केला आहे. त्याचबरोबर परळी विधानसभा मतदारसंघात एकूण ३९६ बूथ आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या धांदलीनंतर उच्च न्यायालयाने १२२ बूथ अतिसंवेदनशील असल्याचे म्हटले होते. या बूथवर अतिरिक्त सुरक्षा पुरविणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. मात्र जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच निवडणूक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे २०१ बूथवर हल्ले झाले, तर १०१ बूथ कॅप्चर करण्यात आले. निवडणूक अधिकाऱ्यांनी या बूथ कॅप्चरिंगवर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणही आव्हाड यांनी केली. परळीमध्ये बूथ कॅप्चर करताना गोट्या गीतेचा व्हिडीओ आम्ही दिला आहे, असेही आव्हाड म्हणाले आहेत.

https://x.com/Awhadspeaks/status/1877729795250745510?

न्यायालयाने १५६/३ प्रमाणे गोट्या गित्ते व गॅंगवर ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करूण गोट्या गित्ते आणि गॅंगला अटक करण्याची हिम्मत दाखवावी,” अशा आशयाची पोस्ट एक्सवर जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!