
सोशल मिडीया स्टारचा या लेग स्पिनरबाबत खळबळजनक खुलासा
विवाहित लेग स्पिनर पाठवायचा सेल्फी आणि मेसेज, म्हणाली मला दर २ तासांनी तो....
मुंबई – भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच चॅम्पियन ट्राॅपी जिंकली आहे. त्यानंतर आता सर्व खेळाडू आयपीएलची तयारी करत आहेत. त्यातच आता एका सोशल मिडीया इन्फ्लुएंसर सीमा कन्याल हिने संघातील एक लेगस्पिनर खेळाडूबाबत खळबळजनक दावा केला आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सीमा कन्याल हिने टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूवर गंभीर आरोप केले आहेत.हा खेळाडू तिला मेसेज करायचा आणि फोटो पाठवायचा असा आरोप तिने केला आहे. एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत सीमा कन्यालने हे खळबळजनक आरोप केले आहेत.टीम इंडियाचा लेग स्पिनर तिला सतत डीएम करायचा.तब्बल ६ ते ७ महिने हा संपूर्ण प्रकार सूरू होता. सीमाच्या या आरोपानंतर क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली आहे. सीमाने पॉडकास्टमध्ये त्या क्रिकेटपटूचे नाव उघड केले नाही. सीमाच्या या खुलाशानंतर सोशल मीडियावर विविध अंदाज बांधले जात आहेत. लोक वेगवेगळ्या भारतीय लेग स्पिनरवर संशय व्यक्त करत आहेत. पण सीमाने अजून कोणाचेही नाव घेतलेले नाही. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सीमा कन्यालचा दावा आहे की भारतीय क्रिकेट संघाच्या लेग स्पिनरने तिला डीएम केले.’ पुढे याबद्दल आणखी काय माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
सीमा कन्यालबद्दल बोलायचे झाले, ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती वेळोवेळी तिच्या प्रवासाचे आणि वेगवेगळ्या सुंदर ड्रेसमधील फोटो शेअर करत राहते. इन्स्टाग्रामवर तिचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.