
जवानाची भाजपा नेत्याला भर रस्त्यात बेदम मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, या कारणामुळे झाली मारहाण
लखनऊ – उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका आरपीएफ जवानाने एका भाजपा नेत्याला मारहाण केली आहे. गाडी ओव्हरटेक करण्याच्या वादातून सुरु झालेला वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचला.
बरेलीच्या सीबीगंज भागातील स्लीपर रोड येथे राहणारे आणि भाजपच्या सीबीगंज मंडळाचे कोषाध्यक्ष अजय गुप्ता रात्री आपल्या कारने मिनी बायपास रस्त्यावरून जात होते. यावेळी कर्मचारी नगर चौकीजवळ आरपीएफ जवान मनवीर चौधरी यांनी त्यांच्या गाडीला ओव्हरटेक केल्याने गुप्ता यांना अडवले. आणि गाडीतून बाहेर काढत बेदम मारहाण केली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मध्ये पडून अजय गुप्तांची सुटका केली, मात्र तोपर्यंत काहींनी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकला, त्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. आरोपी जवानाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरपीएफ जवानाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लल्लूराम ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
इन्स्पेक्टर बिजेंद्र सिंग यांनी सांगितले की, आरोपी आरपीएफ जवान असून त्याच्याविरोधात चौकशी सुरू आहे. तसेच, अजय गुप्तांचे वैद्यकीय परीक्षण करण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.