माझ्या मुलीच्या हत्येमागे काही आमदारांचा हात आहे
नेहाच्या वडिलांचा धक्कादायक आरोप, त्या आमदारांवरुन राजकीय वातावरण तापले, ते आमदार कोण?
हूबळी – कर्नाटकच्या हुबळीमध्ये काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांच्या मुलीचा महाविद्यालयात खून झाल्यानंतर त्यावेळी कर्नाटकमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले होते. त्यावेळी काँग्रेस आणि भाजपा समोरासमोर आले होते.
नेहाचा खून करणारा आरोपीचे नाव फयाज असल्यामुळे भाजपाने या मुद्दयावर लव्ह जिहादचा आरोप केला होता. त्यावेळी काँग्रेसचे नगरसेवक असलेले नेहाचे वडील निरंजन हिरेमठ यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. आरोपी फय्याज याला अटक करून धारवाड जिल्ह्याच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलं. आता त्याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली होती. नेहाने आपल्याशी बोलण्यास नकार दिला, त्यामुळे तिच्यावर चाकूने वार केल्याचं त्याने पोलिसांना सांगितले होते. पण आता मेहाच्या वडिलांनी धक्कादायक खुलासा केला आहे. राज्य सरकारने १२० दिवसांत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते; पण कोणतीही प्रगती झालेली नाही. या खुनामागे काही आमदारांचा हात आहे, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी’, अशी मागणी त्यांनी केली आहे. आता तो आमदार कोण? अशी चर्चा सुरु झाली आहे. नेहाची हत्या झाल्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांनी सांगितले की, मी फयाजला ओळखतो.त्याने नेहाला प्रेम करत असल्याचे सांगितले होते. मात्र नेहाने त्याला नकार दिला आणि त्यातून हि घटना घडली असल्याचे सांगितले होते.
१८ एप्रिल २०२४ या दिवशी हुब्बळ्ळीच्या विद्यानगरमधील बीव्हीबी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थिनी नेहा हिरेमठ यांची निर्घृण हत्या झाली होती. हत्या करणारा आरोपी फयाज याला पोलिसांनी काही वेळातच अटक केली होती. मात्र अद्याप फयाजला शिक्षा झालेली नाही.