Latest Marathi News
Ganesh J GIF

वाय फायच्या किरकोळ वादातून मुलाने केला आईचा खून

आईला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल, वडील आणि बहिणीलाही मारहाण, नराधम मुलाला अटक

महेंद्रगढ – राजस्थानमधील महेंद्रगढ जिल्ह्यातलएका मुलाने वाय – फायवरून झालेल्या वादातून आपल्या आईची काठीने मारहाण करत हत्या केली. या संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

निवृत्त सैनिक लक्ष्मण सिंग हे त्यांची पत्नी संतोष आणि मुलांसह महेंद्रगढ जिल्ह्यातील अरुण विहार कॉलनीत राहतात. सोमवारी दुपारी घरात वाय-फायवरून वाद झाला. त्यामुळे धाकटा मुलगा नवीन इतका संतापला की त्याने आपल्या वडिलांना आणि बहिणींना धक्काबुक्की करायला सुरुवात केली. जेव्हा त्याची आई हस्तक्षेप करण्यासाठी आली तेव्हा त्याने त्याचा राग तिच्यावर काढला. संतापलेल्या मुलाने प्रथम आपल्या आईला मारहाण केली आणि हस्तक्षेप करण्यासाठी आलेल्या वडिलांना आणि बहिणीलाही धक्काबुक्की केली. त्यानंतर त्याने आईचा गळा दाबला आणि तिच्या डोक्यावर काठीने वार केले. यामुळे जखमी झालेल्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आरोपीच्या बहिणीने एक व्हिडिओ शूट केला, ज्यामध्ये तो त्याच्या आईला काठीने मारहाण करत आहे आणि तिच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर ठोसा मारत आहे. आई वेदनेने ओरडत आहे. त्याची धाकटी बहीण आणि वडील त्याला रोखण्याचा प्रयत्न करतात, परंतु तो आईला मारहाण करतच होता. मोठ्या भावाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे महेंद्रगड जिल्ह्यातील लष्करी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबांमध्ये शोककळा पसरली आहे.

 

पश्चिम जयपूरचे डीसीपी हनुमान प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला मूळची महेंद्रगड जिल्ह्यातील खेडी तलवाना गावातील रहिवासी होती. तिचे पती लक्ष्मण सिंह सुमारे 10 वर्षांपूर्वी सैन्यातून निवृत्त झाले होते. धाकटा मुलगा नवीन याचे लग्न २०२० मध्ये झाले होते, परंतु काही महिन्यांनंतर पत्नी त्याला सोडून गेली आणि बुलंदशहर येथे हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!