
मोबाईल पासून दुर राहत बनली तरुण सनदी अधिकारी
पाचवीतील अपयश झटकत मिळवले मोठे यश, सुंदर चेहरा आणि कर्तृत्वामुळे नेहा सोशल मिडीयावर स्टार, प्रेरणादायी प्रवास
दिल्ली – मोबाईल हा आजच्या काळात गरजेची वस्तू बनला आहे. पण या मोबाईलवर आपला महत्वाचा वेळ वायासुद्धा जात आहे. अनेकांना मोबाईल नसेल किंवा नेट संपले असेल तर कशातच मन लागत नाही. पण एका तरूणीने तीन वर्ष मोबाईल पासून लांब राहत अधिकारी होण्यात यश मिळवले आहे.
यूपीएससी परीक्षा भारतातील सर्वात आव्हानात्मक परीक्षांपैकी एक आहेत, ज्यामध्ये दरवर्षी असंख्य इच्छुक जिकंण्यासाठी दिवस-रात्र एक करतात. या परीक्षेत यश मिळाल्यावर होणारा आनंद वेगळाच असतो. राजस्थानातील जयपूर येथे जन्मलेल्या आणि छत्तीसगडमध्ये वाढलेल्या नेहा ब्याडवाल हिने अनोख्या पद्धतीने अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. नेहा ब्याडवाल गुजरातमधील भरूच येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाली आहे. वयाच्या २४ व्या वर्षी ती आयएएस झाली. ती देशातील सर्वात तरुण आयएएस अधिकाऱ्यांमधील एक आहे. विशेष म्हणजे नेहाला गुजरातमधील भरूच येथे पहिली पोस्टिंग मिळाली आहे. ती मूळची जयपूरची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिचे वडील आयकर अधिकारी आहेत आणि तिची बहीण देखील आयईएस अधिकारी आहे. नेहा पाचवीत नापास झाली होती तरीदेखील तिने यातून धडा घेत अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. नेहाने दिवसाला १७-१८ तास अभ्यास केला आणि तीन वर्षे तिचा फोन वापरला नाही. परिक्षेत ९६० गुण मिळवून ती अधिकारी बनली. नेहा ब्याडवालने यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस २०२१ च्या निकालात २६० वा रँक मिळवला होता. त्यानंतर, नेहाचे नाव २०१३ च्या यादीतही ती आली होती.यावर्षी आयएएस नेहाने ५६९वा रँक मिळवला आहे. नेहा सोशल मिडीयावर देखील खुपच प्रसिद्ध आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर नेहा ब्याडवालचा देसी लूक खूप चर्चेत आहे. तिने एक लाखाच्या जवळपास फाॅलोअर्स आहेत.
नेहाचा जन्म ३ जुलै १९९९ रोजी राजस्थानमधील जयपूर येथे झाला. तिने डीपीएस कोरबा आणि डीपीएस बिलासपूर येथे शिक्षण घेतले आणि नंतर रायपूरच्या डीबी गर्ल्स कॉलेजमधून पदवी घेतली. नेहा कॉलेजमध्ये टॉपर देखील राहिलेली आहे. नेहा ब्याडवालची यांची ही स्टोरी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.