उत्तर प्रदेश – युपीतील कन्नोज भागात एक विचित्र घटना समोर आली आहे. दोन मैत्रीणींनी लग्न केल्याची घटना घडली आहे. त्यात महत्वाचे म्हणजे एक मैत्रीण तब्बल ७ लाख रुपये खर्च करून मुलगा झाली आहे. या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे.
कन्नौज जिल्ह्यातील सरायमीरा येथे राहणाऱ्या एका सराफा व्यावसायिकाच्या मुलीने तिच्या मैत्रिणीसोबत २५ नोव्हेंबर रोजी लग्न केले आहे. यासाठी तब्ब्ल ७ लाख रुपये खर्च करुन तरूणीने लिंगबदल शस्त्रक्रिया देखील केली आहे. त्यामुळे हा विवाह परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या दोन मुलींची २०२० साली एका सोन्याच्या दुकानात भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. हळूहळू त्या दोघी एकमेकींच्या प्रेमात पडल्या. आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या हट्टापुढे घरातील सदस्यही काही करू शकले नाहीत आणि त्यांनी दोघींच्या लग्नाला परवानगी दिली.
अलीकडे लिंगबदल शस्त्रक्रिया होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परदेशाबरोबर आता भारतातही अशा शस्त्रक्रिया होण्याचे प्रमाण वाढले आहे. मध्यंतरी एका प्रसिद्ध चित्रपट निर्माता दिग्दर्शकच्या मुलाने लिंग बदल करुन मुलगी झाल्याची घटना समोर आली होती.