
अजब! दोन सख्ख्या भावांनी केले एकाच तरुणीसोबत लग्न
अनोख्या विवाहाची सर्वत्र चर्चा, असं करण्यामागचं कारण काय?, हट्टी समुदायाची चर्चा
शिमला – हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील गिरीपार येथील हाटी परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येथे बऱ्याच वर्षांनंतर जोडप्याच्या लग्नाची परंपरा पुन्हा सुरू झाली आहे. परिसरातील दोन भावांनी एका वधूसोबत एकाच मंडपात लग्न केले.
सुनीता चौहान ही कुन्हाट गावची रहिवासी असून तिने शिलाई येथील दोन भाऊ प्रदीप आणि कपिल नेगी यांच्यासोबत लग्न केले. दोघेही उच्चशिक्षित असून एक भाऊ सरकारी नोकरीवर आहे तर दुसरा भाऊ विदेशात नोकरी करतो. मागील आठवड्यात १२ जुलै रोजी ट्रान्स-गिरी भागात सुरू झालेल्या या तीन दिवसीय विवाह सोहळ्यात हट्टी संस्कृतीतील विशिष्ट लोकगीते, नृत्य आणि रीतिरिवाज पार पडले. महत्वाचे म्हणजे, हा निर्णय परस्पर संमतीने आणि कोणत्याही दबावाशिवाय घेण्यात आल्याचे सुनीता चौहान हिने म्हटले आहे. दोन्ही भावांनी पारंपारिक हिंदू रितीरिवाजांनुसार वधूशी लग्न केले. हे तिघांच्याही संमतीने झाले. लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, पांडव काळातील या परंपरेची चर्चा सामान्य लोकांमध्ये होत आहे. हिमाचलमधील सिरमौर, किन्नौर आणि उत्तराखंडमधील जौनसर बावर सारख्या भागात बहुपत्नीत्व प्रचलित आहे. हट्टी जमात ही हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या सीमेवर स्थायिक आहे. तीन वर्षांपूर्वी या जमातीला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला होता. या जमातीमध्ये शतकानुशतके बहुपतित्व प्रथा प्रचलित आहे. मध्यंतरीच्या काळात महिलांमधील वाढलेलं शिक्षणाचं प्रमाण आणि परिसरातील आर्थिक विकासामुळे अशा लग्नांची प्रकरणं कमी झाली होती. बहुपती प्रथेला हिमाचल प्रदेशमध्ये कायदेशीर मान्यता आहे.
दोन अथवा दोनहून अधिक भाऊ एकाच तरुणीसोबत लग्न करतात. या प्रथेचे ऐतिहासिक मूळ हिमाचल प्रदेशातील ट्रान्स-गिरी प्रदेशातील हट्टी जमातीमध्ये आहे. या प्रथेनुसार, पत्नी परस्पर सहमतीने कुठल्याही वेळी आणि कितीही दिवसांसाठी दोन्ही भावांमध्ये बदलत राहते. सर्वात मोठ्या भावाला कायदेशार पिता म्हणून घोषित केले जाते. मात्र, सर्व भाऊ एकत्रितपणे पालन-पोषणाची जबाबदारी पार पाडतात.