Latest Marathi News
Ganesh J GIF

अजबच! महिलेने नवऱ्यासमोर केले पुतण्याशी लग्न

लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ, पतीवर आरोप करत पुतण्याशी लग्न, पण यामुळे आयुषी अडचणीत?

पटना – बिहारमधील जमुई जिल्ह्यात काही दिवसापूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. एका महिलेने आपल्याच पुतण्यासोबत नव-यासमोरच लग्न केले होते. या लग्नाची संपूर्ण देशात चर्चा झाली होती. पण आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.

आयुषी दुबे असे त्या महिलेचे नाव आहे. तिने आपला पुतण्या सचिन दुबे याच्यासोबत लग्न केले आहे. विशेष म्हणजे या लग्नाला तिचा पती विशाल दुबे सुद्धा उपस्थित होता. मिळालेल्या माहितीनुसार, आठ वर्षांपूर्वी विशाल दुबे यांचे आयुषीशी लग्न झाले. त्यांना एक गोंडस मुलगी आहे. लग्नानंतर काही वर्षे सर्व काही सामान्य होते. परंतू दोन वर्षांपूर्वी त्याच गावातील सचिन नावाच्या एका तरुणाने आयुषीच्या आयुष्यात प्रवेश केला. तो विशालचा दूरचा पुतण्या होता. हळूहळू दोघे जवळ येऊ लागले. सहा दिवसांपूर्वी आयुषी घर सोडून सचिनसोबत पळून गेली. विशालने बंदुकीच्या धाकावर पत्नीचे अपहरण केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. पण आयुषीने आपण सचिन सोबतच राहणार असल्याचे सांगत विशालसोबत जाण्यास नकार दिला. विशाल याने पत्नी आयुषीविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. तसेच घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला, पण अद्याप तो मंजूर न झाल्यामुळे सचिन आणि आयुषीचे लग्न वैध की अवैध असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान माझा पती माझा सारखा छळ करायचा, त्यामुळे मी सचिनची नवा जोडीदार म्हणून निवड केली आहे. माझी मुलगी माझ्या आधीच्या पतीसोबतच राहील, तर मी सचिनसोबत राहीन. दरम्यान, सचिननेही आयुषीसोबतच्या प्रेमाचा स्वीकार करत लग्न करून आम्ही खूश असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पोलीसांसमोरही कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे जेवढे अजब लग्न होते. तेवढ्याच अजब अडचणी आता समोर आल्याने यात ट्विस्ट आला आहे.

 

आयुषीचा आधीचा पती विशाल याने या लग्नाबाबत आणि आयुषीसोबतच्या नात्याबाबत आता आपल्याला कुठलंही देणं घेणं नसून, आता तिला जिथे राहायचं असेल, जसं राहायचं असेल, तसं ती राहू शकते, मी आता तिचा पुन्हा स्वीकार करणार नाही, असं सांगितले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!