Latest Marathi News
Ganesh J GIF

पत्रकार शशिकांत वारीशे हत्याप्रकरणातील गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी

महाराष्ट्र राज्य प्रिंट व डिजिटल मिडीया पत्रकार संघाचे लोणी काळभोर पोलिसांना निवेदन

पुणे दि १२(प्रतिनिधी)- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघात नसून घातपात केला आहे. याची उच्चस्तरीय चाैकशी झाली पाहिजे. या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सुभाष काळे यांना निवेदन दिले आहे.

पोलिसांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्रात ठाम भुमिका घेऊन निर्भय, अन सत्यावर आधारित पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. पत्रकारांवर हल्ले करुन किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकार संरक्षण कायदा आहे. मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही पोलीसांकडुन टाळाटाळ केली जात आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील दैनिक महानगरी टाईम्सचे पत्रकार शशिकांत वारीशे यांनी रिफायनरी विरोधात वृत्त दिले होते. त्यामुळे राजापूर हायवे येथे रिफायनरी समर्थकांनी हत्या केली होती. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

निवेदन देताना महाराष्ट्र राज्य प्रिंट व डिजिटल मिडीयावर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील जगताप, पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर,राज्य खजिनदार विजय काळभोर, जेष्ठ सल्लागार तुळशीराम घुसाळकर, जिल्हा समन्वयक तुकाराम गोडसे, हवेली तालुकाध्यक्ष संदीप बोडके, उपाध्यक्ष चंद्रकांत दुडे, अमोल अडागळे, अमोल भोसले,जयदीप जाधव, हनुमंत चिकणे,विशाल कदम,आदी पत्रकार उपस्थित होते.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!