
सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना पोलिसांकडून अटक; ड्रायव्हरचे अपहरण करून डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल
कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलिस चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. बाळाच्या बापाची शुक्रवारी न्यायालयीन कुठली दरवांगी करण्यात आल्यानंतर पोलिसांनी बाळाच्या आजोबांना देखील एका गुन्ह्यात अटक केली आहे.अपघात प्रकरणानंतर पोर्शे कारमधील ड्रायव्हरचे अपहरण करून त्याला डांबून ठेवल्या प्रकरणी आजोबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्रकुमार अग्रवाल असे बाळाच्या आजोबाचे नाव आहे. गंगाधर शिवराज हेरिक्रुब (४२) असे फिर्यादी ड्रायव्हरचे नाव
यापूर्वी देखील सुरेंद्रकुमार अग्रवाल याच्यावर २००९ साली कुख्यात गुंड छोटा राजन याच्यामार्फत सुपारी देऊन खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तसेच आजवर अनेक तक्रारी अग्रवाल कुटुंबियांसंदर्भात पोलिसांकडे प्राप्त आहेत. शनिवारी मध्यरात्री सुरेंद्र कुमार अग्रवाल याचा नातू मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने कार चालवत दुचाकीवरील तरुण तरुणीला उडवत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे.याप्रकरणी बालहक्क न्याय मंडळाच्याआदेशानुसार संबंधित अल्पवयीन बाळ बालसुधारगृहात असून त्याच्या बापाची म्हणजेच विशाल अग्रवाल याची शुक्रवारी न्यायालयाने न्यायालयीन कुठलीत रवानगी केली. हे सगळे सुरू असतानाच पोलिसांनी हा धक्का दिल्याने या प्रकरणात आणखी नेमके काय होते हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी अग्रवाल कुटुंबीयांचे नाव समोर आले आहे. याप्रकरणी विशाल अग्रवाल, त्याचे वडील सुरेंद्रकुमार अग्रवाल यांची पुणे पोलिसांनी चौकशी केली. अग्रवाल कुटुंबियांच्या विरोधात अनेक तक्रारी पुणे पोलिसांना प्राप्त झाल्या असून या सगळ्या तक्रारींचा तपास पुणे पोलीस करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, अग्रवाल कुटुंबीयांसंदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करायची असेल तर त्याने पोलिस ठाणे किंवा गुन्हे शाखेला तक्रार द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.