Latest Marathi News
Ganesh J GIF

आश्चर्य! देव तारी त्याला कोण मारी

मोठ्या अपघातातून महिला थोडक्यात बचावली. अपघाताचा थरार अंगावर काटा आणणारा

कल्याण – देशात रोज अपघात होत असतात. याला अनेक घटक जबाबदार असतात. अरुंद रस्त्यामुळे देखील होणाऱ्या अपघातांची संख्या मोठी आहे. पण कल्याणमधील एका अपघातात महिला जीवघेण्या अपघातातून बचावली आहे. या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

कल्याणच्या तिसगांव प्रवेशद्वारासमोर विठ्ठलवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अपघाताची घटना घडली होती. संध्याकाळच्या सुमारास एक टेम्पो रस्त्याने चालला होता. संध्याकाळच्या वेळी एक टेम्पो विठ्ठलवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याने चालला होता. या टेम्पोला लागूनच एक स्कूटर जात होती. पण अरुंद रस्त्यामुळे स्कूटरवरील महिलेचा तोल गेला आणि ती स्कुटरसह रस्त्यावर आडवी पडली. पण महिलेने तेथून तात्काळ पळ काढला. आणि पुढच्याच सेकंदात ती स्कूटर टेंम्पोच्या चाकाखाली आली. एक सेकंदाचा जरी ऊशीर झाला असता तर ती महिलाच टेंम्पोखाली आली असती. याप्रसंगी टेम्पो चालक न थांबला पुढे निघून गेला. पण इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांनी धाव घेऊन महिलेला मदत केली. या अपघातात महिला किरकोळ जखमी झाली आहे. अपघाताचा हा सारा प्रकार परिसरातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

 

अपघाताला कारणीभूत ठरलेला टेम्पो चालकाला कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. स्कूटरस्वार महिलेचे नाव कळू शकले नाही. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!