
सुयशने अश्लील व्हिडिओ दाखवत शरीर संबंधासाठी दबाव टाकला
वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील चोंधे कुटुंबाचे धक्कादायक कारनाने समोर, काळी जादू मुलींचा पुरवठा आणि हुंड्यासाठीही छळ
पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. राजेंद्र हगवणे फरार असताना त्याला मदत करणाऱ्या चोंधे कुटुंबाचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.यामुळे खळबळ उडाली असून संताप व्यक्त होत आहे.
राजेंद्र हगवणे यांना फरार होण्यासाठी थार गाडी देणाऱ्या चोंधे कुटुंबाचे काळे कारनामे समोर आले आहेत. सुयश चौंधे यांच्या पत्नी धनश्री चौंधे यांनी गंभीर आरोप केले आहेत. २० लाखांच्या हुंड्यांसाठी आपला छळ केला जात असल्याची तक्रार जानेवारी महिन्यात खडकी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात राज्य महिला आयोगाकडेही तक्रार दिली होती. पण महिला आयोगने त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप धनश्रीने केला आहे. नवरा सुयश चौंधे, दीर संकेत चोंधे, सासरा नरेश चौंधे, सासू वैशाली चौंधे हे सर्व २० लाख रुपयांच्या हुंड्यासाठी आपला शारिरीक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप सुयश चौंधे यांच्या पत्नाने केला आहे. आपण या सर्वांविरोधात पोलीस आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली होती. पण त्यांनी आपल्या तक्रारीकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले. त्यांच्या त्रासाला कंटाळून आपणही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असा गाैप्यस्फोट धनश्रीने केला आहे. नवरा सुयश चौंधे ब्ल्यु फिल्म दाखवून शरीर संबंध ठेवायचा. नवरा आणि दीर दोघेही सासूसमोरच गांजा प्यायचे, असाही आरोप महिलेने केला आहे. तसेच आपल्याला आणि आपल्या मुलीला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. दोघेही भाऊ दिवसभर दारू प्यायचे, मुलींना घेऊन फिरायचे, हेच त्यांचं रूटीन आहे. शीतल उभे नावाची एक महिला मुळशीतील पोरांना मुली पुरवते असा धक्कादायक खुलासाही धनश्री चौंधे यांनी केला आहे. धनश्री यांची सासू वैशाली चोंधे त्यांना काळी जादू करण्यासाठी भाग पाडायचे. नवरा बायको वेगळे व्हावेत म्हणून सासू कडून काळ्या जादूचे प्रयोग धनश्री हिच्यावर केले गेले असंही तक्रारीत म्हटलं आहे. आता यामुळे चोंधे कुटुंबियांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. चोंधेची आई गावची उपसरपंच होती. तिने आधी निवडणुका लढल्या आहेत. चोंधेंची पार्श्वभूमी देखील राजकारणातील आहे. एकंदरीत हगवणे संबंधित सर्वच घरात सुनांचा छळ होत असल्याचे समोर आले आहे. पण पोलीस आणि महिला आयोगाचे कारवाई न करण्यासाठी कोणाचा दबाव होता, याचे उत्तर मात्र अजूनही समोर आलेले नाही. दरम्यान आला आहे. सुनांचा अमानुष छळ करणारे चोंधे कुटुंब आता पुरते अडचणीत सापडले आहेत. आता पोलिस चोंधे कुटुंबीयांवर काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
वैष्णवी प्रकरणी संकेतचा मोठा भाऊ सुयश आधीच अटकेत आहे. सुयश आणि संकेतच्या क्रेटा आणि थार गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. चोंधे बंधू गाडीवर लाल दिवा लावून फिरवत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. संकेत नंबर प्लेट नसलेली गाडी घेऊन पोलिस स्टेशनला घेऊन आला होता, हे देखील उघड झालं आहे.