
स्वतः च्या आईवर अश्लील विनोद करणारी स्वाती ट्रोल
व्हिडिओ व्हायरल, नेटकरी संतापले, म्हणाली माझ्या कुल आईच्या खोलीत मला....
मुंबई – स्टँडअप काॅमेडी हा प्रकार सध्या खुपच लोकप्रिय होत आहे. पण त्यात विनोदी निर्मिती करणारे कलाकार सर्रासपणे अश्लील भाषा वापरण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे यावर अनेकदा टिकाही झाली आहे. पण आता आणखी एक तरुणी यामुळे वादात अडकली आहे.
महिला स्टँड-अप कॉमेडियन स्वाती सचदेवाने स्वतःच्या आईबद्दल केलेल्या अश्लील विनोदामुळे लोकांनी संताप व्यक्त केला आहे. स्वाती सचदेवा हिने नुकताच एक शो केला. यात ती तिची आई कशी ‘कूल मॉम’ बनायचा प्रयत्न करते हे सांगते. यादरम्यान ती सांगते की आईला तिच्या खोलीमध्ये एक व्हायब्रेटर सापडतो आणि त्यानंतर झालेला संवाद ती विनोदी अंगाने सांगण्याचा प्रयत्न करते. यावेळी तिच्यासमोर बसलेले प्रेक्षक हसतातही, मात्र नेटकऱ्यांना विनोदाचा हा किळसवाणा प्रकार आवडलेला नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी स्वाती सचदेवा हिच्यावर सडकून टीका केली आहे. कुटुंबातील प्रौढ व्यक्तींवर अश्लील विनोद करून तिने सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्याचा हल्लाबोल नेटकऱ्यांनी केला आहे. दरम्यान रणवीर अलाहाबादियाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते. तर समय रैनालाही पोलिसांच्या नोटिशीला उत्तर द्यावे लागले होते. त्यांतर आता स्वातीच्या विनोदावर चर्चा होत आहे.
https://x.com/ReporterSahab/status/1905832816920637545?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1905832816920637545%7Ctwgr%5E3a817badf180f4886739e838c705d11616ade29d%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या यूट्यूब शोवरून बराच वाद झाला. रणवीर अल्लाहबादियाने शोमध्ये पालकांबद्दल अश्लील टिप्पणी केली होती, त्यानंतर अनेक राज्यांमध्ये त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.